Thursday, May 10, 2018

#सातबारा - ३

मराठी माणसासाठी सोशल मीडियामधला एक अभिनव उपक्रम..

प्रश्न ५

बोजा म्हणजे  काय आहे?

उत्तर - बोजा म्हणजे कर्जाची अथवा शासकीय थकबाकीची ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात घेतलेली नोंद होय.

प्रश्न ६

७\१२ उताऱ्यावरील उजव्या बाजूला जो बोजाचा रकाना असतो. त्यात पोकळ बोजा किंवा भरलेल्या कर्जाच्या नोंदीला () कंस केलाला असतो. अशा नोंदी उताऱ्यावरून कशा कमी करता येतात, किंवा कधी कमी होतात.

उत्तर -

कंस केला म्हणजे ती नोंद कमी केली असा अर्थ होतो. निश्चिंत रहावे..

प्रश्न ७

मला शेती घ्यायची आहे, कागदपत्रांविषयी माहिती हवी आहे.

उत्तर -

७/१२, फेरफार, ८अ, नकाशा इत्यादी कागदपत्रे अभ्यासावी. शेतीजमीन खरेदीसाठी शेतकरी असणे आवश्यक असते.

प्रश्न ८

मी २०१८ मध्ये पुनर्वसन मध्ये मिळालेला मोकळा येणे प्लॉट,विकत घेतला आहे, काही अडचण असू शकतो का?

उत्तर -

पुनर्वसनात मिळालेली जमीन १० वर्षे विकता येत नाही. या अटीचा भंग झाला नाही ना? हे तपासावे.

__________________________

ज्ञानभाषामराठीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन तुम्हाला मराठीतूनच केले जाईल. असे विविध अभिनव उपक्रम 'सर्वत्रमराठी' या भव्य उपक्रमाचा भाग आहेत. यातून लोकभाषा म्हणून सर्वच क्षेत्रात मराठी अधिकाधिक सक्षम करणे आणि इतर भाषांवरील परावलंबित्त्व कमी करणे त्याचप्रमाणे वाट चुकलेल्या नवपालकांना मराठी शाळांकडे वळवणे हा उद्देश आहे.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment