मराठी माणसासाठी सोशल मीडियामधला एक अभिनव उपक्रम..
प्रश्न - १५
गुंठा , आर , स्क्वेअर फूट , स्क्वेअर मी,यातील फरक सांगा.
उत्तर -
१ गुंठा=१०१.१७ स्क्वेअर मी
१ आर=१०० स्क्वेअर मी
१ गुंठा=३३फुट×३३फुट=१०८९ स्क्वे फुट
१ एकर=४० गुंठे
१ हेक्टर=१०० आर
प्रश्न - १६
वर्ग क्र. १ ची असलेली जमीन वर्ग क्र. २ कधी होते?
उत्तर - सर्व जमिनीवर सार्वभौम सत्ता शासनाची. आपण फक्त भोगवटादार,मालक नाही.
जमिनीचे ढोबळ प्रकार तीन:
- भोगवटादार वर्ग एक : अटी शर्तीशिवाय दिलेली जमिन
- भोगवटादार वर्ग दोन : म्हणजे अटी शर्तीवर दिलेली जमिन
- सरकारी पट्टेदार : शासकीय जमिन लीजने ठराविक कालावधी साठी दिली जाते
वर्ग एक जमिन शासनाने भुसंपादन केल्यावरच वर्ग दोन बनेल.
तरीदेखील प्रश्न अजुन सविस्तर विचारल्यास अधिक समाधान कारक उत्तर देता येईल.
प्रश्न - १७
माझ्याकडे एन .ए. प्लॉट असून सातबारावर १२४.७० चौ .मी. क्षेत्र आहे व सिटी सर्वेमध्ये १२७ चौ. मी. आहे तर खरे क्षेत्र कोणते ?
उत्तर - बिनशेती झाल्याने व ७/१२ व मिळकतपत्रिका दोन्ही चालू असल्याने, कालांतराने तेथिल ७/१२ बंद होईल. त्यामुळे सिटी सर्वे चे क्षेत्र अंतिम राहील
प्रश्न - १८
वडिलांच्या भावांनी जमीन नावावर केली नाही वडील वारले तर माझ्या नावावर जमीन कशी होईल.
उत्तर - चुलत्यांची नावे वारसाने सात बारावर आली असतील आणि वडील व त्यांचे पश्चात आपण सर्व मुलांची वारस नोंद होणे बाकी असेल तर ज्या फेरफाराने चुलत्यांची नावे सातबाराला नोंदवण्यात आली त्या फेरफारवर उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील दाखल करावे लागेल. सातबारावर जर अद्याप कोणाचीही वारस नंतर झाली नसेल तर आजोबा वडील यांचा मृत्यू दाखला वारस प्रतिज्ञापत्र यासह तलाठी यांच्याकडे अर्ज दाखल करावा व वारस नोंद करून घ्यावी .
प्रश्न - १९
कृषिक जमिनीवर शेत गड्यासाठी तसेच मालकाला राहता यावं यासाठी बांधकाम करायचं असेल(शेतघर) तर त्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी?
प्रक्रिया काय आहे?
उत्तर -
याबाबतचा शासन निर्णय आहे. त्यानुसार शेतघरासाठी अकृषक परवानगीची आवश्यकता नाही. परंतु बांधकाम परवानगीसाठी नियोजन प्राधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.
सातबाराची प्रत्येक पोस्ट पुढील ब्लॉगवर वाचू शकता -
http://saatbaara.blogspot.in
__________________________
ज्ञानभाषामराठीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन तुम्हाला मराठीतूनच केले जाईल. असे विविध अभिनव उपक्रम 'सर्वत्रमराठी' या भव्य उपक्रमाचा भाग आहेत. यातून लोकभाषा म्हणून सर्वच क्षेत्रात मराठी अधिकाधिक सक्षम करणे आणि इतर भाषांवरील परावलंबित्त्व कमी करणे त्याचप्रमाणे वाट चुकलेल्या नवपालकांना मराठी शाळांकडे वळवणे हा उद्देश आहे.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान