मराठी माणसासाठी सोशल मीडियामधला एक अभिनव उपक्रम..
प्रश्न - ९
माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर नवीन सातबाऱ्यामध्ये आई, बहिण आणि भावाचे नाव लावले गेले परंतु माझे नाव लावले गेले नाही. माझे नाव सातबाऱ्यावर लावायचे असल्यास काय प्रक्रिया आहे?
उत्तर - वारस म्हणुन तुमचे नाव वारसा ठराव (गाव नमुना ६ क)व फेरफार ला इतर वारसांसोबत आहे का तपासा.असल्यास ,७/१२ वर अंमल देण्यासाठी तहसिलदार यांच्या कडे अर्ज द्या.
फेरफार मधे नाव नसलेस सदर फेरफारवर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपिल करा.
प्रश्न - १०
सातबारा ऑनलाईन वेबसाईटवर पाहत असताना तो दाखविल्या जात नाही.
उत्तर - अद्याप त्यातील दुरुस्ती झाली नसेल.तलाठी यांच्या कडे प्रख्यापन प्रत मागणी करा व दुरूस्ती असल्यास निदर्शनास आणा.
प्रश्न ११ -
माझ्या आईच्या आईची म्हणजे माझ्या आजीची तीच्या माहेरची जमीन आहे त्यामध्ये माझा आईचा हिस्सा मिळेल का? आणि त्या सातबारावरती माझ्या आईचे नाव नोंदणी करण्यास काय करावे ?
उत्तर - आजीचे लग्न १९५६ नंतरचे असल्यास हिस्सा मिळु शकतो. तत्पुर्वी मुलींना वडिलांच्या मिळकतीत वाटा नव्हता. कागदपत्रे तपासून निश्चित उत्तर देता येईल.
प्रश्न १२ -
माझ्या मित्राच्या वडिलांनी दुसरं लग्न केल आणि सर्व जमीन आणि स्थावर मालमत्ता त्यांनी दुसरं लग्न केलेल्या बाईंच्या नावाने केलेलं आहे आणि पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर घटस्फोट घेतलेला नाही तर नझुल ऑफिस मध्ये फेरफार करून आणि सातबारामध्ये फेरफार करून त्याच नाव टाकता येत काय ?
तर या संदर्भात कृपया मार्गदर्शन करावे....
उत्तर - पहिलं लग्न झाल्यानंतर पत्नी मयत होण्यापूर्वी दुसरे लग्न केल्यास दुसरे लग्न अवैध ठरते परंतु दुसऱ्या पत्नीच्या मुलांना वडिलोपार्जित जमिनीत हक्क असतो .पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांना वडिलोपार्जित जमिनीत वारसाहक्काने आपले नाव सातबारा व प्रॉपर्टी कार्डवर हिंदू वारसा कायद्यानुसार लावता येईल .यासाठी प्रतिज्ञापत्र मृत्यू दाखला इत्यादी पुराव्यासह तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय तसेच भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करावा .
सातबाराची प्रत्येक पोस्ट पुढील ब्लॉगवर वाचू शकता -
http://saatbaara.blogspot.in
__________________________
ज्ञानभाषामराठीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन तुम्हाला मराठीतूनच केले जाईल. असे विविध अभिनव उपक्रम 'सर्वत्रमराठी' या भव्य उपक्रमाचा भाग आहेत. यातून लोकभाषा म्हणून सर्वच क्षेत्रात मराठी अधिकाधिक सक्षम करणे आणि इतर भाषांवरील परावलंबित्त्व कमी करणे त्याचप्रमाणे वाट चुकलेल्या नवपालकांना मराठी शाळांकडे वळवणे हा उद्देश आहे.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:
Post a Comment