Wednesday, May 9, 2018

#सातबारा - २

मराठी माणसासाठी सोशल मीडियामधला एक अभिनव उपक्रम..

प्रश्न - ३

माझ्या पत्नीच्या नावावर लागूनच असलेले दोन प्लॉट आहेत, त्यांचे एकत्रीकरण करून एकच सातबारा करता येईल काय? (गोंदिया - तिरोडा)

उत्तर - होय, उपअधिक्षक भुमीअभिलेख यांचेकडे ७/१२ एकत्रीकरण बाबत अर्ज करावा. त्यांचेकडील कमीजास्त पत्रकानुसार पोटहिस्से न पाडता तलाठी यांनी स्वतंत्र ७/१२ केले असल्यास, तहसिलदार यांचेकडे अर्ज करावा.

प्रश्न - ४

फेरफार नोंदी मिळवण्यासाठी काय करावे?

उत्तर - ७/१२ मध्ये कायदेशीर हक्काचे अनुषंगाने बदल करण्यासाठी फेरफार नोंद घेतली जाते.यासाठी आवश्यक पुरावे उदा.खरेदी दस्त, वारस प्रमाणपत्र, मृत्यु पत्र , न्यायालय आदेश ई. कागदपत्र जोडुन तलाठी यांचेकडे अर्ज करावा.

सातबाराची प्रत्येक पोस्ट पुढील ब्लॉगवर वाचू शकता -

__________________________

ज्ञानभाषामराठीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन तुम्हाला मराठीतूनच केले जाईल. असे विविध अभिनव उपक्रम 'सर्वत्रमराठी' या भव्य उपक्रमाचा भाग आहेत. यातून लोकभाषा म्हणून सर्वच क्षेत्रात मराठी अधिकाधिक सक्षम करणे आणि इतर भाषांवरील परावलंबित्त्व कमी करणे त्याचप्रमाणे वाट चुकलेल्या नवपालकांना मराठी शाळांकडे वळवणे हा उद्देश आहे.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment