Monday, May 7, 2018

#सातबारा - १

#सातबारा

मराठी माणसासाठी सोशल मीडियामधला एक अभिनव उपक्रम..

प्रश्न - १

उस्मानाबाद जिल्ह्यातील माझ्या मूळगावी आमची १८ एकर शेतजमीन आहे. या शेतजमिनीचे पुनर्मुल्यांकन करून जमिनीची हद्द ठरवायची आहे. आमचे शेजारी आडमुठे आहेत. मला सरकारची पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया जाणून घ्यायची आहे.

उत्तर - शेतजमिनीचे पुनर्मुल्यांकन आणि हद्द ठरवणे असे तुमचे २ प्रश्न आहेत. मोजणी ३ प्रकारची असते... साधी, तातडीची, अतितातडीची(कालावधी ६महिने ते १महिना .. क्रमानुसार). हद्दीवरील शेतकरी अडेल असला तरी मोजणी होते, त्याला नोटीस जाते. मुल्यांकन कामी 'दुय्यम निबंधक' यांच्या कार्यालयातुन शीघ्रसिद्धगणकानुसार (ready reckoner)दर निश्चित करुन घेता येईल. 'दुय्यम निबंधक' यांचेकडील मुल्यांकन मान्य नसल्यास सह जिल्हा निबंधक, मुद्रांक यांचेकडे दाद मागता येते. गटाच्या हद्दीखुणा मोजणीद्वारे 'उपअधिक्षक भुमीअभिलेख' यांच्या कडुन निश्चित करून घेता येतील.

प्रश्न - २

आमच्या येणेजाणे वही वाट दिली जात नाही १९६६ पासून आम्ही ती वाट वापरतोय आता नवीन जागा मालक ती वाट बदलून चुकीची वहिवाट करू पाहतोय,काय करावें

उत्तर - वाट अडविल्यापासुन ६ महीन्याचे आत तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा. शेतमाल वाहतूकीसाठी रस्ता देण्यासाठी मामलतदार न्यायालय अधिनियम १९०५ कलम ५ नुसार तरतुदीचा वापर करून तहसीलदार रस्ता खुला करून देऊ शकतात.
__________________________

ज्ञानभाषामराठीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन तुम्हाला मराठीतूनच केले जाईल. असे विविध अभिनव उपक्रम सर्वत्रमराठी या भव्य उपक्रमाचा भाग आहेत. यातून लोकभाषा म्हणून सर्वच क्षेत्रात मराठी अधिकाधिक सक्षम करणे आणि इतर भाषांवरील परावलंबित्त्व कमी करणे त्याचप्रमाणे वाट चुकलेल्या नवपालकांना मराठी शाळांकडे वळवणे हा उद्देश आहे.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

2 comments:

  1. माझ्या प्रश्नाचे उत्तर नही मिळाले

    ReplyDelete
  2. दादा, शेकडो प्रश्न आले आहेत. २-२ उत्तरांच्या पोस्ट्स प्रसारीत करत आहोत

    ReplyDelete